-
केंब्रिज डिक्शनरीमार्फत (Cambridge Dictionary) 'वर्ड ऑफ द इयर (Word of the Year) २०२०' म्हणून 'क्वारंटाईन (Quarantine)' या शब्दाची निवड करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
'क्वारंटाईन (Quarantine)' हा शब्द यावर्षी केंब्रिज डिक्शनरीमध्ये सर्वाधिक शोधण्यात आलेला शब्द असल्याचे सध्या उपलब्ध आकडेवारीच्या आधारे स्पष्ट झाले आहे.
-
केंब्रिजच्या संपादकांच्या निरीक्षणानुसार लोक या वर्षी हा शब्द 'एखाद्या सर्वसाधारण कालावधीत ज्या लोकांना रोगाचा त्रास किंवा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून घरे सोडण्याची किंवा मुक्तपणे प्रवास करण्याची परवानगी नाही' अशा नवीन मार्गाने वापरत आहेत.
-
विलगीकरण करून ठेवण्याची ही नवीन पद्धती केंब्रिज शब्दकोशामध्ये जोडण्यात आली आहे.