• स्पेसएक्सने (SpaceX) १४३ उपग्रह प्रक्षेपित करून आपल्या ट्रान्सपोर्टर - १ नावाच्या महत्वाकांक्षी अभियानाची यशस्वी सुरुवात केली आहे.

ठळक मुद्दे

  • एकाच रॉकेटमधून इतके उपग्रह प्रक्षेपित करत स्पेसएक्सने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

  • फेब्रुवारी २०१७ मध्ये एका मिशनमध्ये पीएसएलव्ही (PSLV) सह १०४ उपग्रह तैनात करण्याचा भारताच्या इस्रोने स्थापित केलेला विक्रम सदर प्रक्षेपणासह स्पेसएक्सने मोडला आहे.

  • सदर प्रक्षेपणामध्ये दोन-टप्प्यातील फाल्कन ९ रॉकेटचा (Falcon ९ rocket) वापर करण्यात आला आहे.

  • प्रक्षेपित करण्यात आलेल्या १४३ उपग्रहांमध्ये १३३ व्यावसायिक आणि सरकारी उपग्रह तसेच स्पेसएक्सच्या १० स्टारलिंक उपग्रहांचा समावेश होता.

स्पेसएक्सबाबत (SpaceX) महत्वपूर्ण माहिती

  • संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: एलोन मस्क हे या पदावर कार्यरत आहेत.

  • अध्यक्ष: ग्वेन शॉटवेल हे अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.

  • स्थापना वर्ष: २००२ साली SpaceX ची स्थापना करण्यात आली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: कॅलिफोर्निया, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे SpaceX च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.