-
बुंदेलखंड प्रदेशातील पाण्याचे संकट सोडविण्याकरिता उत्तर प्रदेश सरकारमार्फत इस्राईल सरकारसोबत सहकार्याच्या योजनेवर स्वाक्षरी करण्यात आली आहे. बुंदेलखंडमधील दुष्काळग्रस्त भागातील पाण्याचे संकट दूर करण्याच्या उद्देशाने दोन्ही सरकारांमध्ये भागीदारीचा विचार करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
बुंदेलखंडसारख्या जलदुर्भिक्षता असलेल्या क्षेत्रासाठी ठिबक सिंचनसारखे अद्ययावत शेती तंत्रज्ञान पुरवण्यासह हे प्रादेशिक शेतकऱ्यांना आधार देण्याचे कार्य करेल अशी अपेक्षा आहे.
-
सदर प्रकल्पाद्वारे बुंदेलखंड आणि त्याच्या आसपासच्या भागातील पाण्याच्या कमतरतेवर लक्ष देण्यात येईल आणि उर्वरित देशातील भूजल व्यवस्थापन, सिंचन आणि पिण्यायोग्य पाणी व्यवस्थापनासाठी एक आदर्श मॉडेल निर्माण होईल अशी अपेक्षा आहे.
-
भारत- इस्त्राईल बुंदेलखंड जलप्रकल्पात समाविष्ट असणारे जलसंधारण, जल कार्यक्षम वाहतूक आणि शेतीसाठी प्रगत पाण्याच्या पद्धती हे तीन महत्वपूर्ण घटक आहेत.
महत्वपूर्ण माहिती
-
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री: योगी आदित्य नाथ हे सध्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून पदभार सांभाळत आहेत.
-
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल: आनंदीबेन पटेल या सध्या उत्तर प्रदेशच्या राज्यपाल म्हणून पदभार सांभाळत आहेत.
-
इस्रायलचे पंतप्रधान: बेंजामिन नेतान्याहू हे सध्या इस्रायलचे पंतप्रधान म्हणून कार्यरत आहेत.