-
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (Indian Space Research Organisation - ISRO) च्या PSLV-C ५१ मार्फत ब्राझीलचा अॅमेझोनिया (Amazonia) - १ उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
६३७ किलोग्रॅम वजनाचा अॅमेझोनिया - १ हा भारतामधून प्रक्षेपित होणारा ब्राझीलचा पहिला उपग्रह बनला आहे.
-
राष्ट्रीय अवकाश संशोधन संस्थेचा (National Institute for Space Research - INPE) हा ऑप्टिकल पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे.
ISRO बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: ISRO म्हणजेच Indian Space Research Organisation अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था होय.
-
सध्याचे अध्यक्ष: के. सिवन हे सध्या ISRO च्या अध्यक्ष पदावर आहेत.
-
स्थापना वर्ष: १५ ऑगस्ट १९६९ रोजी ISRO ची स्थापना करण्यात आली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: बंगळुरू, कर्नाटक हे ISRO च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.