• एम. सी. मेरी कोमची नुकतीच ट्रायफेड (Tribal Cooperative Marketing Development Federation Ltd - TRIFED) आदि महोत्सवाच्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • भगवान बिरसा मुंडा यांचे नातू सुखराम मुंडा यांच्या उपस्थितीत केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री श्री. अर्जुन मुंडा यांनी नवी दिल्लीतील दिल्ली हाट येथे TRIFED आदि महोत्सवाचे उद्घाटन केले.

  • सदरचा राष्ट्रीय आदिवासी सण आहे असून आदिवासी व्यवहार मंत्रालय आणि TRIFED यांचा संयुक्त उपक्रम आहे.

TRIFED बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: TRIFED म्हणजेच 'Tribal Co-operative Marketing Federation of India' अर्थात 'भारतीय आदिवासी सहकारी विपणन महासंघ' होय.

  • स्थापना वर्ष: ६ ऑगस्ट १९८७ रोजी TRIFED ची स्थापना करण्यात आली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे TRIFED च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • सध्याचे अध्यक्ष: रमेश चंद मीना हे सध्या TRIFED च्या अध्यक्ष पदावर विराजमान आहेत.

  • संस्थेचे उद्दिष्ट: आदिवासींचा सामाजिक-आर्थिक विकास करणे हे TRIFED चे मुख्य उद्दिष्ट आहे.