• बजाज अलिअन्झ लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (Bajaj Allianz Life Insurance Company Limited) या खाजगी आयुर्विमा कंपनीच्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर पदावर बॉलीवूड अभिनेता आयुष्मान खुरानाला नियुक्त करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • जीवन विमा कंपनीचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर या नात्याने अभिनेता आयुष्मान खुराना बजाज अलिअन्झ लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या उत्पादनांना तसेच कंपनीद्वारे पुरवण्यात येणाऱ्या डिजीटल सेवांना प्रोत्साहन देईल अशी अपेक्षा आहे.

बजाज अलिअन्झ लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडबाबत महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: २००१ साली या जीवन विमा कंपनीची स्थापना करण्यात आली होती.

  • व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: तरुण चुग हे या पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: पुणे, महाराष्ट्र हे कंपनीच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.