-
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयामार्फत नुकतीच 'बायोटेक-प्राईड (Promotion of Research and Innovation through Data Exchange - PRIDE) मार्गदर्शक तत्वे' जारी करण्यात आली आहेत.
ठळक मुद्दे
-
सदर तत्वांचे अनावरण केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री श्री. जितेंद्र सिंग यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
-
जैविक ज्ञान, माहिती यांची देवाणघेवाण सुलभ आणि सक्षम करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.
-
भारतीय जैविक माहिती केंद्रामार्फत (Indian Biological Data Centre - IBDC) सदर मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.