• लोकसभेमार्फत नुकतेच संसद सदस्यांचे वेतन, भत्ते आणि निवृत्तीवेतन (सुधारणा) विधेयक (Salary, Allowances and Pension of Members of Parliament - Amendment Bill), २०२० संमत करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर विधेयकात संसदेच्या सर्व सदस्यांचे वेतन १ वर्षाच्या कालावधीसाठी ३० टक्क्यांनी कमी करण्याचा विचार करण्यात आला आहे.

  • कोविड-१९ महामारीमुळे उद्भवणाऱ्या त्वरित आर्थिक गरजा भागविण्यासाठी १ एप्रिल २०२० पासून या विधेयकाचा अंमल सुरु होईल अशी अपेक्षा आहे.

  • संसद सदस्यांचे वेतन, भत्ते आणि निवृत्तीवेतन (सुधारणा) विधेयक, २०२० हे संसद सदस्यांचे वेतन, भत्ते आणि निवृत्तीवेतन (सुधारणा) अध्यादेश, २०२० ची जागा घेईल.

  • ६ एप्रिल, २०२० रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने हा अध्यादेश काढला होता.