• ऑनलाईन खेळांवर बंदी घालणाऱ्या विधेयकास नुकतीच आंध्र प्रदेश विधानसभेमार्फत मंजूरी देण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • 'आंध्र प्रदेश गेमिंग (दुरुस्ती) विधेयक २०२०' आंध्र प्रदेश विधानसभेत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले आहे.

  • सदर विधेयक मंजूर झाल्यानंतर राज्यात ऑनलाईन गेमिंगला बंदी घालण्यात आली आहे.

  • राज्यातील तरुणवर्ग ऑनलाईन गेम्स खेळून आत्महत्या करत असल्याने सदर विधेयक मांडण्यात आले असल्याचे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांनी स्पष्ट केले.

  • राज्यातील फसवणूकीसारख्या संघटीत गुन्हेगारीला आळा घालणे हा सदर गेमिंग कायद्यात सुधारणा करण्यामागील मुख्य हेतू  आहे.

आंध्र प्रदेश राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: १ नोव्हेंबर १९५६ रोजी आंध्र प्रदेश राज्याची स्थापना झाली होती.

  • राज्यपाल: विश्वभूषण हरीचंदन हे सध्या राज्यपाल पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यमंत्री: वाय. एस. जगनमोहन रेड्डी हे सध्या मुख्यमंत्री पदावर कार्यरत आहेत.

  • भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने आंध्र प्रदेश राज्य देशात ७ व्या क्रमांकावर आहे.