• सरकारी थिंक टँक नीती आयोगामार्फत राष्ट्रीय, राज्य/केंद्रशासित प्रदेश तसेच जिल्हा स्तरावर गरीबी मोजण्यासाठी पहिला बहु-आयामी गरीबी निर्देशांक (Multi-dimensional Poverty Index  - MPI) जाहीर करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • सदर निर्देशांकानुसार बिहार हे बहुआयामी दारिद्र्याची सर्वोच्च पातळी असणारे राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे.

निर्देशांकानुसार अव्वल राज्य क्रमवारी

  • १. बिहार

  • २. झारखंड

  • ३. उत्तर प्रदेश

  • ४. मध्य प्रदेश

  • ५. मेघालय

शीर्ष ५ सर्वात कमी दारिद्र्य असलेली राज्ये

  • केरळ

  • गोवा

  • सिक्कीम

  • तमिळनाडू

  • पंजाब

NITI आयोगाबाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: NITI म्हणजेच National Institution for Transforming India अर्थात भारत परिवर्तनासाठी राष्ट्रीय संस्था होय.

  • स्थापना वर्ष: १ जानेवारी २०१५ साली नीती आयोगाची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे नीती आयोगाच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • अध्यक्ष: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नीती आयोगाच्या अध्यक्ष पदावर आहेत.

  • उपाध्यक्ष: राजीव कुमार हे नीती आयोगाच्या उपाध्यक्ष पदावर आहेत.

  • मुख्य कार्यकारी अधिकारी: अमिताभ कांत हे नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर आहेत.