• अवनी लेखरा हिने २०२१ सालच्या 'पॅरालिम्पिक क्रीडा पुरस्कारांमध्ये (Paralympic Sport Awards)' नुकताच ‘सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण (Best Female Debut)’ पुरस्कार पटकाविला आहे.

ठळक मुद्दे

  • अवनी लेखराने २०२० च्या टोकियो पॅरालिम्पिकमध्ये नेमबाजीत भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून देत इतिहास रचला होता.

  • आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीमार्फत सदर पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

  • पॅरालिम्पिक गेम्सच्या एकाच आवृत्तीत २ पॅरालिम्पिक पदके जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे.