-
एरो इंडिया (Aero India)-२१ ची १३ वी आवृत्ती ३ ते ७ फेब्रुवारी २०२१ दरम्यान बेंगळुरू, कर्नाटक येथे संपन्न होणार आहे.
ठळक मुद्दे
-
केंद्रीय संरक्षण मंत्री श्री. राजनाथ सिंग यांच्या हस्ते एरो इंडिया-२१ साठीच्या वेबसाईटचे अनावरण करण्यात आले आहे.
-
एरो इंडिया हा आशिया खंडातील सर्वात मोठा हवाई देखावा आणि विमानचालन प्रदर्शन आहे.
-
१९९६ सालापासून बेंगळुरू येथे हे प्रदर्शन द्वैवार्षिक स्वरूपात आयोजित करण्यात येते.
-
aeroindia.gov.in या संकेत स्थळाद्वारे सदर प्रदर्शनाबाबत माहिती उपलब्ध होते.