• कर्नाटकचे मुख्यमंत्री श्री. बी. एस. येडियुरप्पा यांच्यामार्फत नुकतेच 'अवलोकन (Avalokana)' सॉफ्टवेअरचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर सॉफ्टवेअर राज्य सरकारला जवळपास १८०० कार्यक्रमांवरील खर्च आणि मंजुरीवरील माहिती बाबत कार्यशील राहण्यास सक्षम करेल अशी अपेक्षा आहे.

  • शाश्वत विकास लक्ष्ये, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना तसेच केंद्र पुरस्कृत योजनांवर लक्ष केंद्रित करण्यास हे सॉफ्टवेअर अत्यंत सहाय्यभूत ठरेल अशी खात्री आहे.

कर्नाटक राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यमंत्री: बी. एस. येडियुरप्पा हे सध्या कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत.

  • राज्यपाल: वजुभाई वाला हे सध्या कर्नाटकच्या राज्यपाल पदावर विराजमान आहेत.

  • राज्य स्थापना वर्ष: १ नोव्हेंबर १९५६ रोजी कर्नाटक राज्याची स्थापना झाली होती.

  • राजधानी शहर: बंगळुरू ही कर्नाटकची राजधानी आहे.

  • भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने कर्नाटक देशात ६ व्या स्थानावर आहे.