-
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री श्री. जय राम ठाकूर यांनी जाहीर केले आहे की पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी सप्टेंबर २०२० च्या अखेरीस 'अटल बोगद्याचे' उद्घाटन करतील.
ठळक मुद्दे
-
लेह-मनाली महामार्गावरील पीर पंजाल श्रेणीमधील रोहतांग खिंडीत हा बोगदा तयार करण्यात येत आहे.
-
समुद्र सपाटीपासून याची उंची ३१०० मीटर इतकी आहे.
-
सदर बोगद्याची लांबी ८.८ किलोमीटर इतकी आहे.
बोगद्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
बोगद्याच्या निर्मितीबाबतचा प्रस्ताव हा १८६० सालचा आहे. सर्वात पहिल्यांदा मोराव्हियन मिशनमार्फत (Moravian Mission) हा प्रस्ताव मांडण्यात आला होता.
-
त्यानंतर १३९ वर्षानी तत्कालीन पंतप्रधान श्री. अटल बिहारी वाजपेयी यांनी पुन्हा हा प्रस्ताव आणला.
-
सुरवातीला त्यास रोहतांग बोगदा असे नाव देण्यात आले. मात्र नंतर २०१९ मध्ये पंतप्रधान मोदींनी त्याचे नाव 'अटल बोगदा ' असे ठेवले.
-
मनाली ते लेह दरम्यानचे अंतर या बोगद्यामुळे ४६ किलोमीटर कमी होईल.
रोहतांग खिंडीबाबत महत्वपूर्ण माहिती
-
ही खिंड कुलू दरी खोरे आणि हिमाचल प्रदेशमधील लाहौल आणि स्पिती या खिंडींना जोडण्याचे कार्य करते.
-
चिनाब व बियास नद्यांच्या मधल्या पाणलोट क्षेत्रावर हा मार्ग आहे.