• भारतीय तंत्रज्ञान संस्था (Indian Institute of Technology - IIT), मद्रासने ‘अटल रँकिंग ऑफ इंस्टीट्यूशन्स ऑन इनोव्हेशन अचिव्हमेन्ट्स (Atal Ranking of Institutions on Innovation Achievements - ARIIA) २०२० मध्ये भारतातील सर्वोत्कृष्ट केंद्रीय अर्थसहाय्य संस्था म्हणून पहिले स्थान कायम राखले आहे.

ठळक मुद्दे

  • २०२० च्या ‘अटल रँकिंग ऑफ इंस्टीट्यूशन्स ऑन इनोव्हेशन अचिव्हमेन्ट्स (Atal Ranking of Institutions on Innovation Achievements - ARIIA) उपराष्ट्रपती श्री. व्यंकय्या नायडू यांच्याकडून केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल ‘निशंक’ यांच्या उपस्थितीत एका आभासी कार्यक्रमात जाहीर करण्यात आले.

  • सन २०२० मध्ये राष्ट्रीय महत्त्व असलेल्या ६७४ संस्था, केंद्रीय विद्यापीठे आणि केंद्रीय अनुदानित तांत्रिक संस्थांनी २०१९ मधील ४९६ संस्थांच्या तुलनेत उत्साहाने या क्रमवारीत भाग घेतला होता.

क्रमवारीतील पहिल्या ५ केंद्रीय अनुदानित संस्था

  • भारतीय तंत्रज्ञान संस्था मद्रास (IIT Madras)

  • भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (IIT Mumbai)

  • भारतीय तंत्रज्ञान संस्था दिल्ली (IIT Delhi)

  • भारतीय विज्ञान संस्था बेंगलुरू (IISc Bengaluru)

  • भारतीय तंत्रज्ञान संस्था खरगपूर (IIT Kharagpur)

ARIIA बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: ARIIA म्हणजेच Atal Ranking of Institutions on Innovation Achievements अर्थात नाविन्यपूर्ण कृतींवरील संस्थांचे अटल रँकिंग होय.

  • सुरुवात वर्ष: २०१९ मध्ये शिक्षण मंत्रालयाच्या नाविन्य विभागामार्फत ARIIA रँकिंगची सुरुवात करण्यात आली होती.

  • उद्दिष्ट: तंत्रज्ञान व विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यता, उद्योजकता, स्टार्टअप आणि विकासानुसार उच्च शिक्षण संस्था आणि विद्यापीठे यांची क्रमवारी ठरवणे हे ARIIA चे उद्दिष्ट आहे.