-
पर्यटन व सांस्कृतिक राज्यमंत्री श्री. प्रह्लादसिंग पटेल आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री श्री. शिवराजसिंग चौहान यांच्यातर्फे संयुक्तपणे मध्य प्रदेशातील खजुराहो येथे ‘महाराजा छत्रसाल अधिवेशन केंद्राचे' उद्घाटन करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
सदर केंद्र हे पर्यटन मंत्रालयाच्या स्वदेश दर्शन योजनेंतर्गत विकसित केले गेले आहे.
मध्य प्रदेश बाबत महत्वपूर्ण माहिती
-
मुख्यमंत्री: शिवराजसिंह चौहान हे सध्या मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत.
-
राज्यपाल: आनंदीबेन पटेल सध्या मध्य प्रदेशच्या राज्यपाल पदावर विराजमान आहेत.
-
राज्यनिर्मिती वर्ष: १ नोव्हेंबर १९५६ रोजी राज्याची स्थापना झाली होती.
-
राजधानी: भोपाळ ही सध्या मध्य प्रदेशची राजधानी आहे.
-
राज्याची विशेषता: मध्य प्रदेश हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील दुसरे सर्वात मोठे राज्य आहे.