• केंद्रीय सुरक्षा मंत्री श्री. राजनाथ सिंग यांच्यामार्फत बेंगळूरु येथे ‘चीफ ऑफ एअर स्टाफ’ (Chiefs of Air Staff - CAS) बैठकीचे उद्घाटन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर २ दिवसीय बैठकीचे डिजीटल मिडीयाच्या व्यापक वापरासह हायब्रीड स्वरूपामध्ये आयोजन करण्यात आले होते.

  • सुमारे ७५ देशांच्या हवाईदल प्रमुखांमार्फत एकाच व्यासपीठावर एकत्र येऊन धोरण आणि तंत्रज्ञानाच्या घडामोडींशी संबंधित सध्याच्या मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण करण्यात आली आहे.

IAF बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: IAF म्हणजेच Indian Air Force अर्थात भारतीय हवाई दल होय.

  • प्रमुख: राकेश कुमारसिंग भदौरिया हे वायुसेनेचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

  • स्थापना वर्ष: ८ ऑक्टोबर १९३२ रोजी वायुसेनेची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे IAF च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • ब्रीदवाक्य: 'नभः स्पृशं दीप्तम्' हे IAF चे ब्रीदवाक्य आहे.