• IUCN - समर्थित आशिया संरक्षित क्षेत्र भागीदारीचा (Asia Protected Areas Partnership - APAP) सह-अध्यक्ष म्हणून नोव्हेंबर २०२३ पर्यंत भारताची ३ वर्षांच्या कालावधीसाठी निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • सध्या या पदावर कार्यरत असलेल्या दक्षिण कोरियाची जागा भारत घेईल.

  • सह-अध्यक्ष म्हणून भारतावर इतर आशियाई देशांना त्यांचे संरक्षित क्षेत्र व्यवस्थापित करण्यास मदत करण्याची जबाबदारी  असेल.

IUCN बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: IUCN म्हणजेच International Union for Conservation of Nature अर्थात आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटना होय.

  • मुख्यालयाचे ठिकाण: ग्लॅण्ड, स्वित्झर्लंड हे IUCN च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • अध्यक्ष: झाँग झिंगसेंग हे सध्या IUCN च्या अध्यक्षपदावर आहेत.

  • संस्थापक: ज्युलियन हक्सले हे IUCN चे संस्थापक आहेत.

  • स्थापना वर्ष: ५ ऑक्टोबर १९४८ रोजी IUCN ची स्थापना करण्यात आली होती.