-
भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत (Reserve Bank of India - RBI) नुकतीच दीपक कुमार आणि अजय कुमार चौधरी यांची नूतन कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
कार्यकारी संचालक म्हणून पदोन्नती होण्यापूर्वी दीपक कुमार हे RBI च्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते.
-
अजय चौधरी हे पर्यवेक्षण विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक होते.
RBI बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: RBI म्हणजेच 'Reserve Bank of India' अर्थात 'भारतीय रिझर्व्ह बँक' होय.
-
सध्याचे गव्हर्नर: शक्तीकांत दास हे सध्या RBI चे २५ वे गव्हर्नर म्हणून कार्यरत आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई येथे RBI च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना: १ एप्रिल १९३५ रोजी कोलकाता येथे RBI ची स्थापना झाली होती.