• उत्तर प्रदेश राज्य सरकारतर्फे मानवी-तस्करीविरोधी पोलिस ठाण्यांची (Anti-human Trafficking Police Stations) स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • उत्तर प्रदेश सरकारमार्फत महिला आणि मुलांच्या सुरक्षेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलताना प्रत्येक जिल्ह्यात अशा पद्धतीची पोलिस ठाणी स्थापन करण्याचा स्वागतार्ह निर्णय घेण्यात आला आहे.

  • सदर पोलिस ठाण्यांना गुन्हा नोंदविणे आणि स्वतंत्रपणे प्रकरणाची चौकशी करणे याबाबतचे पुरेसे अधिकार देण्यात येतील अशी सुविधा करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेश राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यमंत्री: योगी आदित्य नाथ हे सध्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून पदभार सांभाळत आहेत.

  • राज्यपाल: आनंदीबेन पटेल या सध्या उत्तर प्रदेशच्या राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत.

  • राज्यदर्जा प्राप्त वर्ष: २४ जानेवारी १९५० रोजी उत्तर प्रदेशला राज्यदर्जा प्राप्त झाला होता.

  • भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने उत्तर प्रदेश राज्याचा देशात चौथा क्रमांक लागतो.