• मध्य प्रदेश राज्य सरकारमार्फत ‘अंकुर’ नावाच्या योजनेचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर योजनेंतर्गत नागरिकांना पावसाळ्यात झाडे लावल्याबद्दल पुरस्कृत करण्यात येणार आहे.

  • या उपक्रमात भाग घेणाऱ्या नागरिकांना कार्यक्रमात लोकसहभागाची खात्री करुन घेण्यासाठी प्राणवायू पुरस्कार देण्यात येईल अशी अपेक्षा आहे.

मध्य प्रदेश बाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यमंत्री: शिवराजसिंह चौहान हे सध्या मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत.

  • राज्यपाल: आनंदीबेन पटेल सध्या मध्य प्रदेशच्या राज्यपाल पदावर विराजमान आहेत.

  • राज्यनिर्मिती वर्ष: १ नोव्हेंबर १९५६ रोजी राज्याची स्थापना झाली होती.

  • राजधानी: भोपाळ ही सध्या मध्य प्रदेशची राजधानी आहे.

  • राज्याची विशेषता: मध्य प्रदेश हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील दुसरे सर्वात मोठे राज्य आहे.