• अंदमान आणि निकोबार बेटांना मुख्य भूमीला जोडणारी जलमग्न ऑप्टिकल फायबर केबलचे (Optical Fibre Cable - OFC) पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • २३०० कि.मी. लांबीची जलमग्न केबल अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये उत्तम इंटरनेट सुविधा व मोबाईल जोडणी प्रदान करुन अनेक संधींना चालना देण्याचे कार्य करेल अशी अपेक्षा आहे.

  • जलमग्न केबलच्या माध्यमातून स्वस्त आणि चांगल्या जोडणीच्या मदतीने अंदमान आणि निकोबार या बेटांना डिजीटल इंडियाचे सर्व फायदे मिळणे सुलभ होईल.

  • अंदमान आणि निकोबार बेटे मुख्य भूमीला जोडणारी ऑप्टिकल फायबर केबलचे अनावरण केल्याने इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी भारताच्या नव्या व्यापार रणनीती अंतर्गत मोलाची भूमिका निभावणे अपेक्षित आहे.