• केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळाचे (Central Board of Indirect Taxes and Customs - CBIC) अध्यक्ष एम. अजित कुमार यांच्या हस्ते हरियाणाच्या पंचकुला येथील GST भवनचे उद्घाटन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • पंचकुला येथे जवळपास ३१ कोटी रुपये खर्च करून हे भवन उभारण्यात आले आहे.

  • CBIC चा हा पहिला मोठा पायाभूत प्रकल्प असून कोविड-१९ च्या काळात पूर्ण झाला आहे.

CBIC बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: CBIC म्हणजेच Central Board of Indirect Taxes and Customs अर्थात केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळ होय.

  • स्थापना वर्ष: १९६४ साली CBIC ची स्थापना करण्यात आली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे CBIC च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • ब्रीदवाक्य: 'देशसेवार्थ करसंचय' हे CBIC चे ब्रीदवाक्य आहे.