• केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते नुकतेच कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित 'iRASTE' नावाच्या रस्ता सुरक्षा प्रकल्पाचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • रस्ते अपघात कमी करण्यास सहाय्य करणे तसेच त्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाय शोधणे हा या प्रकल्पाचा मुख्य हेतू आहे.

  • iRASTE म्हणजेच 'इंटेलिजेंट सोल्यूशन्स फॉर रोड सेफ्टी टू टेक्नॉलॉजी अँड इंजिनीअरिंग (Intelligent Solutions for Road Safety through Technology and Engineering)'.

  • महाराष्ट्रातील नागपूर येथे सदर प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला आहे.