-
पत्रकार नितीन सेठी आणि शिव सहाय सिंग यांना अनुक्रमे एशियन कॉलेज ऑफ जर्नलिझम (Asian College of Journalism’s - ACJ) पुरस्कार २०१९ 'अन्वेषक पत्रकारिता पुरस्कार' आणि 'के. पी. नारायण कुमार मेमोरियल सोशल इम्पॅक्ट जर्नालिझम पुरस्कार' पुरस्कार जाहीर झाले. सन २०२१ च्या वर्गाच्या उद्घाटनप्रसंगी जागतिक आरोग्य संघटनेच्या (World Health Organisation - WHO) मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी एका व्हर्च्युअल समारंभात हे पुरस्कार प्रदान केले.
ठळक मुद्दे
नितीन सेठी बद्दल महत्वपूर्ण माहिती
-
नितीन सेठी हे हफिंग्टन पोस्टमधील पत्रकार आहेत.
-
हफिंग्टन पोस्ट इंडियामार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या 'पैसा पॉलिटिक्स (Paisa Politics)' या ६ भागांच्या मालिकेसाठी त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
शिव सहाय सिंग यांच्याबद्दल महत्वपूर्ण माहिती
-
शिव सहाय सिंग हे 'द हिंदू' मध्ये पत्रकार आहेत.
-
द हिंदू मध्ये प्रकाशित झालेल्या 'Death by digital exclusion: On faculty public distribution system in Jharkhand' या त्यांच्या कथेसाठी त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
ACJ पुरस्कारांबद्दल महत्वपूर्ण माहिती
-
मिडिया डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या सहकार्याने ACJ ने भारतीय प्रेक्षकांसाठी तयार केलेल्या सामाजिक प्रभावासाठी पत्रकारिता शोध करण्यासाठी आणि पत्रकारितेच्या सर्वोत्कृष्ट कामांना ओळखून प्रोत्साहित करण्यासाठी २ पुरस्कारांची स्थापना केली आहे.
ACJ बाबत महत्वपूर्ण माहिती
-
मुख्यालयाचे ठिकाण: चेन्नई, तमिळनाडू येथे ACJ चे मुख्यालय आहे.
-
अध्यक्षः शशी कुमार हे सध्या ACJ चे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.