-
'स्टेट बँक ऑफ इंडियामार्फत (State Bank of India - SBI)' कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर 'आरोग्यम हेल्थकेअर बिझनेस लोन (Aarogyam healthcare business loan)' चे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
सदर उपक्रमांतर्गत रुग्णालये, नर्सिंग होम, डायग्नोस्टिक सेंटर, पॅथॉलॉजी लॅबसारख्या आरोग्य घटकांना भौगोलिक स्थानानुसार १०० कोटी रुपयांपर्यंत कर्ज घेणे शक्य होणार आहे
-
कर्ज परतफेड करण्याची मुदत १० वर्षे इतकी आहे.
SBI बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: SBI म्हणजेच State Bank of India अर्थात भारतीय स्टेट बँक होय.
-
अध्यक्षः दिनेश कुमार खारा हे सध्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदावर विराजमान आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई हे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना वर्ष: १ जुलै १९५५ रोजी बँकेची स्थापना झाली होती.
-
संस्थेचे स्वरूप: सार्वजनिक क्षेत्र उपक्रमांतर्गत येणारी संस्था असे बँकेचे स्वरूप आहे.
-
सेवा प्रदान: बँकिंग व आर्थिक सेवा SBI मार्फत पुरवल्या जातात.