झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरने नुकताच भारताच्या सचिन तेंडुलकरचा एकदिवसीय कारकिर्दीचा विक्रम मोडला आहे.

ठळक मुद्दे:

  • ब्रेंडन टेलरने सचिन तेंडुलकरला मागे टाकत पुरुषांच्या क्रिकेटमध्ये सर्वात प्रदीर्घ एकदिवसीय कारकिर्दीचा (२२ वर्षे आणि १४८ दिवस) विक्रम आपल्या नावावर कोरला आहे.
  • सध्या सुरू असलेल्या ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत हरारे येथे झिम्बाब्वे आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या पहिल्या सामन्यात ब्रेंडन टेलरने या विक्रमाला गवसणी घातली आहे.
  • आता २२ वर्षे आणि १४८ दिवसांच्या कारकिर्दीसह टेलरने तेंसचिन तेंडुलकरचा २२ वर्षे आणि ९१ दिवसांच्या कारकिर्दीचा इतकी वर्षे बाधित असणारा विक्रम मोडीत काढला आहे.
  • श्रीलंकेचा सनथ जयसूर्या २१ वर्षे आणि १८४ दिवसांच्या एकदिवसीय कारकिर्दीसह सदर यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे.

सचिन तेंडुलकरचे काही उल्लेखनीय विक्रम:

  • एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा: १८,४२६ धावा
  • सर्वाधिक एकदिवसीय सामने: ४६३ (कालावधी: १९८९ ते २०१२)
  • एकदिवसीय सामन्यांमध्ये द्विशतक झळकावणारा पहिला खेळाडू: २०० धावा (विरोधी संघ: दक्षिण आफ्रिका, वर्ष - २०१०)