इटलीतील पोर्पेटो येथे आयोजित 'आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महा संघाच्या (International Shooting Sport Federation - ISSF) ज्युनियर वर्ल्ड कप शॉटगन २०२६' स्पर्धेत भारताच्या १५ वर्षीय नेमबाज युगन शक्तीवेल मुथुकुमारने पुरुषांच्या 'ट्रॅप' प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे.

ठळक मुद्दे:

  • ८ स्पर्धकांच्या अंतिम फेरीत ३० पैकी २७ लक्ष्यांवर अचूक नेम साधून युगनने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे.
  • इटलीच्या फ्रान्सिस्को टॅनफोग्लिओपेक्षा एका लक्ष्याचा अधिक अचूक वेध घेत त्याने या सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.
  • या दैदीप्यमान कामगिरीनंतर पोर्पेटो ISSF ज्युनियर वर्ल्ड कप शॉटगन स्पर्धेत भारतासाठी हे पहिलेच पदक ठरले आहे.
  • या स्पर्धेत महिलांच्या 'ट्रॅप' प्रकारात ज्युनियर आशियाई विजेती सबीरा हरिस हिने कांस्यपदक जिंकले होते.