नुकतीच योनेक्स फ्रेंच ओपन बॅडमिंटन २०२६ मध्ये क्रिस्टो पोपोव्ह आणि आन से-यंग यांनी एकेरीची विजेतेपदे जिंकली असून भारताची पी. व्ही. सिंधू उपविजेती ठरली आहे.
ठळक मुद्दे:
- फ्रान्समधील 'ट्रेम्बले-एन-फ्रान्स' येथील 'अरेना ग्रँड पॅरिस' येथे सदर बॅडमिंटन स्पर्धा २० ते २५ ऑक्टोबर २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आली होती.
- भारताची पी. व्ही. सिंधू सदर स्पर्धेत महिला एकेरी गटात उपविजेती ठरली आहे.
- पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात फ्रान्सच्या क्रिस्टो पोपोव्हने इंडोनेशियाच्या मोहम्मद झाकी उबैदिल्लाहचा पराभव केला.
- महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात दक्षिण कोरियाच्या आन से-यंगने भारताच्या पी. व्ही. सिंधूवर विजय मिळवला.