नुकतेच जगातील सर्वात तरुण राजा असणाऱ्या युगांडाचे राजे ओयो न्यिंबा यांचे दुःखद निधन झाले आहे.
ठळक मुद्दे:
- जगातील सर्वात तरुण राजा म्हणून सुप्रसिद्ध असणाऱ्या युगांडातील 'टूरू' (Tooro) या पारंपारिक वसाहतपूर्व राज्याचे राजे 'ओयो न्यिंबा कबांबा इगुरु रुकिदी चौथे' यांचे अमेरिकेत निधन झाले आहे.
- ते वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी निवर्तले.
- त्यांचा जन्म १६ एप्रिल १९९२ रोजी झाला होता.
ओयो न्यिंबा यांच्याबद्दल थोडक्यात महत्वाची माहिती:
- न्यिंबा यांचे वडील राजे पॅट्रिक डेव्हिड मॅथ्यू कबोयो ओलिमी तिसरे यांच्या निधनानंतर १९९५ मध्ये वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी ते गादीवर बसले.
- त्यांनी वयाची १८ वर्षे पूर्ण केल्यानंतर अधिकृतपणे जबाबदारी स्वीकारली आणि ते प्राचीन टूरू राज्याचे १३ वे शासक बनले.
- गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने 'जगातील सर्वात तरुण सत्ताधारी शासक' म्हणून त्यांना मान्यता दिली होती.
- युगांडाच्या पश्चिम भागात, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोच्या सीमेजवळ स्थित टूरू राज्याची स्थापना १९ व्या शतकाच्या सुरुवातीस झाली होती.