नुकतीच बर्लिन, जर्मनी येथे 'जागतिक आरोग्य शिखर परिषद (World Health Summit) २०२६' संपन्न झाली आहे.
ठळक मुद्दे:
- जागतिक आरोग्यासाठी एक अग्रगण्य व्यासपीठ म्हणून या परिषदेकडे पाहिले जाते.
- बर्लिन, जर्मनी येथे ११ ते १३ ऑक्टोबर २०२६ दरम्यान या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
- संकल्पना/ थीम (Theme): 'संकटाकडून लवचिकतेकडे: आरोग्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय (From Crisis to Resilience: Innovating for Health)' या संकल्पनेखाली ही शिखर परिषद पार पडली आहे.
- जगासमोरील आरोग्याशी संबंधित अत्यंत कठीण आव्हानांवर चर्चा करणे तसेच विविध क्षेत्रांमधील सहकार्य वाढवणे आणि नाविन्यपूर्ण उपाय शोधणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश होता.
- सदर परिषदेचे अध्यक्ष प्रा. ॲक्सेल आर. प्रीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमात १३० हून अधिक देश तसेच प्रदेशांतील ४,००० हून अधिक व्यक्तींनी आपली प्रत्यक्ष उपस्थिती दर्शविली.