नुकत्याच पार पडलेल्या 'वर्ल्ड बॉक्सिंग U19 चॅम्पियनशिप्स (World Boxing U19 Championships)' २०२६ मध्ये भारताच्या आदित्यने सुवर्णपदक जिंकले आहे.
ठळक मुद्दे:
- मॉन्टेनेग्रोमधील बुडवा येथे १६ ते २७ ऑक्टोबर दरम्यान 'वर्ल्ड बॉक्सिंग U19 (१९ वर्षांखालील) चॅम्पियनशिप्स २०२६' आयोजित करण्यात आली होती.
- भारताच्या आदित्यने पुरुषांच्या ५५ किलो वजनी गटात रशियाच्या इस्लाम मागोमेदोव्हचा अंतिम फेरीत ४-१ असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले.
- रशिया ५ सुवर्ण आणि ५ रौप्य अशा एकूण १० पदकांसह अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे.
- सदर स्पर्धेत भारताने एकूण ४ पदके (१ सुवर्ण, १ रौप्य आणि २ कांस्य) जिंकली तसेच युक्रेनसह संयुक्तपणे ७ वे स्थान पटकावले आहे.
पदक तालिका क्रमवारी
- १. रशिया - १० पदके (५ सुवर्ण, ५ रौप्य)
- २. उझबेकिस्तान - ८ पदके (४ सुवर्ण, २ रौप्य, २ कांस्य)
- ३. अमेरिका - ५ पदके (२ सुवर्ण, १ रौप्य, २ कांस्य)
भारताचे पदक विजेते:
- १. सुवर्ण – आदित्य (पुरुष ५५ किलो)
- २. रौप्य – मेघा शेओकंद (महिला ८० किलो)
- ३. कांस्य – हर्षिका (महिला ६५ किलो)
- ४. प्राची टोकस (महिला ८०+ किलो)