फोर्ब्स (Forbes) आणि स्टॅटिस्टा (Statista) यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशित करण्यात आलेल्या 'जगातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या बँका (World’s Best Performing Banks) २०२६' या अहवालानुसार जगातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या बँकांच्या यादीत HDFC बँक तिसऱ्या क्रमांकावर विराजमान झाली आहे.
ठळक मुद्दे:
- सदर अहवालात सिंगापूरच्या OCBC आणि DBS या बँका अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
- HDFC बँकेने तिसरे तर China Merchants Bank ने चौथे स्थान मिळवले आहे.
- HDFC बँक ही जगातील शीर्ष १० बँकांच्या यादीत स्थान मिळवणारी ही एकमेव भारतीय बँक ठरली आहे.
- यात बँकांच्या कामगिरीचे मूल्यांकन कार्यक्षमता, लवचिकता (resiliency), मालमत्तेचा दर्जा, कार्यक्षमता, वाढ आणि कमाईचा दर्जा या निकषांवर केले जाते.
अहवालातील अव्वल १० बँका (बँक आणि देश):
- १. OCBC (सिंगापूर)
- २. DBS (सिंगापूर)
- ३. HDFC (बँक भारत)
- ४. China Merchants Bank (चीन)
- ५. JPMorgan Chase (अमेरिका)
- ६. Nordea Bank (फिनलंड)
- ७. Wells Fargo (अमेरिका)
- ८. UniCredit (इटली)
- ९. PNC Financial Services (अमेरिका)
- १०. Rabobank (नेदरलँड्स)