'वर्ल्ड जस्टिस प्रोजेक्ट (World Justice Project - WJP)' मार्फत नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या 'रूल ऑफ लॉ इंडेक्स (Rule of Law Index)' २०२६ मध्ये १४३ देशांच्या यादीत भारत ८८ व्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.
ठळक मुद्दे:
- या यादीमध्ये डेन्मार्क अव्वल स्थानावर आहे.
- सदर निर्देशांक हा 'रूल ऑफ लॉ' (कायद्याचे राज्य) संबंधित मूळ आणि स्वतंत्र माहितीचा जगातील प्रमुख स्रोत मानला जातो.
- सदर निर्देशांक यादीत समाविष्ट असणाऱ्या १४३ देशांपैकी भारत ८८ व्या क्रमांकावर स्थित आहे.
- २०२५ मध्ये भारत या यादीत ८६ व्या क्रमांकावर विराजमान होता.
- हा निर्देशांक २००९ पासून दरवर्षी प्रकाशित होतो.
- जगभरात प्रत्यक्ष व्यवहारात 'कायद्याचे राज्य' किती प्रभावी आहे हे मोजण्याचे एक परिमाणात्मक साधन म्हणून या निर्देशांकाकडे पहिले जाते.
अव्वल देश क्रमवारी:
- १. डेन्मार्क (०.९० गुण)
- २. नॉर्वे (०.८९ गुण)
- ३. फिनलंड (०.८७ गुण)
सर्वात तळाचे ५ देश:
- १४३. व्हेनेझुएला (०.२६ गुण)
- १४२. अफगाणिस्तान (०.३१ गुण)
- १४१. हैती (०.३१ गुण)
- १४०. कंबोडिया (०.३१ गुण)
- १३९. निकाराग्वा (०.३२ गुण)