नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या 'जागतिक आर्थिक मंचाच्या (World Economic Forum - WEF)' 'जागतिक लिंग तफावत निर्देशांक (Global Gender Gap Index) २०२६' अहवालामध्ये भारताचे १३१ वे स्थान कायम राहिले आहे.
ठळक मुद्दे:
- या यादीमध्ये आइसलँड सलग १७ व्या वर्षी अव्वल स्थानी विराजमान झाले आहे.
- जागतिक आर्थिक मंचाने आपल्या 'जागतिक लिंग तफावत निर्देशांक'ची २०२६ सालची ही २० वी आवृत्ती प्रकाशित केली आहे.
- सदर निर्देशांक यादीनुसार एकूण १४५ देशांच्या यादीत भारताने आपले १३१ वे स्थान कायम राखले आहे.
अव्वल देश क्रमवारी (देश - प्राप्त गुण):
- १. आइसलँड (०.९३० गुण)
- २. फिनलंड (०.८७२ गुण)
- ३. नॉर्वे (०.८५७ गुण)
WEF च्या जागतिक लिंग तफावत निर्देशांकाबाबत महत्वपूर्ण माहिती:
- २००६ पासून WEF द्वारे दरवर्षी 'जागतिक लिंग तफावत निर्देशांक' अहवाल प्रकाशित करण्यात येतो.
- लिंग समानतेची सद्यस्थिती मांडणे तसेच लिंग तफावत दूर करण्याच्या जागतिक प्रयत्नांची प्रगती यांचे सातत्यपूर्ण मापन करण्याचे मुख्य कार्य हा अहवाल करतो.
- हा निर्देशांक 'आर्थिक सहभाग आणि संधी, शैक्षणिक प्राप्ती, आरोग्य आणि जगण्याची क्षमता आणि राजकीय सक्षमीकरण' या ४ मुख्य आयामांच्या आधारे लिंग समानतेचे मूल्यांकन करतो
जागतिक लिंग तफावत निर्देशांक आणि भारत:
- भारताने ६४.५% लिंग समानता नोंदवली असली तरी ती जागतिक सरासरीपेक्षा कमी आहे.
- २००६ पासून मुख्यत्वे शैक्षणिक प्राप्ती या कारणामुळे यात ४.३% गुणांची सुधारणा झाली आहे.
भारत - तुलनात्मक प्रादेशिक कामगिरी (दक्षिण आशिया):
- ७९. बांगलादेश (०.७१२ गुण)
- ११९. मालदीव (०.६६९ गुण)
- १२०. नेपाळ (०.६६९ गुण)
- १२१. भूतान (०.६६३ गुण)
- १२९. श्रीलंका (०.६४६ गुण)
- १३५. भारत (०.६४५ गुण)