नुकतीच व्होडाफोन आयडियामार्फत (Vodafone Idea - Vi) शाहरुख खानची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच त्यांनी आपल्या नवीन लोगोचे अनावरणदेखील केले आहे.
ठळक मुद्दे:
- भारतातील तिसऱ्या क्रमांकाची सुप्रसिद्ध दूरसंचार सेवा पुरवठादार कंपनी 'व्होडाफोन आयडियाने (Vodafone Idea - Vi)' शाहरुख खानची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे.
- विकासाच्या सुनिश्चित अशा एका नवीन टप्प्याचे संकेत देतानाच कंपनीने आपल्या ब्रँडच्या नवीन रूपाचेदेखील अनावरण केले.
- 'Vi बदल रहा है... तयार रहिये' (Vi is changing… Be ready - Vi बदलत आहे... तयार राहा)' यश परिवर्तनाच्या धोरणावर प्रकाश टाकणारी एक नवीन मोहीमही यावेळी सुरू करण्यात आली.
व्होडाफोन आयडिया ब्रँडमधील बदल - ठळक वैशिष्ट्ये:
- लोगो नूतनीकरण: आधी अस्तित्वात असणारी लोगोची 'V!' अशी रचना बदलून 'Vi' अशी करण्यात आली आहे.
- वैशिष्ट्य: नाविन्याचे प्रतीक असलेला एक गतिमान 3D गोलाकार घटक यात समाविष्ट करण्यात आला आहे.
- मोहीम वाटचाल: ग्राहक-केंद्रित आणि तंत्रज्ञान-आधारित ओळखीकडे होणाऱ्या कंपनीच्या वाटचालीचे प्रतिबिंब दर्शविण्याचे कार्य ही मोहीम करते.
Vi बद्दल महत्वपूर्ण माहिती:
- पूर्ण नाव (Full Form): Vi म्हणजेच Vodafone Idea अर्थात व्होडाफोन आयडिया होय.
- स्थापना वर्ष: २०१८ मध्ये Vi ची स्थापना करण्यात आली होती.
- मुख्यालयाचे ठिकाण: गांधीनगर, गुजरात येथे Vi चे मुख्यालय स्थित आहे
- सध्याचे कार्यरत मुख्य कार्यकारी अधिकारी: सध्या अभिजित किशोर हे Vi च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत आहेत.