लडाखचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांच्यामार्फत नुकतेच झंस्कार खोऱ्यात आयोजित ११ व्या 'लडाख झंस्कार महोत्सवादरम्यान लडाखमधील कुमिक गावाला पहिले 'वारसा गाव (Heritage Village)' म्हणून घोषित करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे:
- कुमिकमधील बौद्ध हस्तलिखिते, पारंपारिक वास्तुकला तसेच सांस्कृतिक प्रथांची दखल घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे.
- जिवंत परंपरांचे जतन करतानाच पर्यटकांना पारंपारिक वस्त्यांकडे आकर्षित करून वारसा पर्यटनाला चालना देणे हा 'विकास भी, विरासत भी' या संकल्पनेअंतर्गत या मान्यतेचा मुख्य उद्देश आहे.
कुमिक 'हेरिटेज व्हिलेज' घोषणेबाबत महत्वाची माहिती:
- लडाखमधील कारगिल जिल्ह्यातील झंस्कार भागात कुमिक हे गाव वसले आहे.
- अतिउंचीवरील, दुर्गम तसेच थंड वाळवंटी प्रदेश हा तिबेटी बौद्ध परंपरा, मठ यासोबतच हस्तलिखितांच्या जतनासाठी प्रामुख्याने ओळखला जातो.
- मुख्यत्वे 'जिवंत वारशावर' 'हेरिटेज व्हिलेज'ची संकल्पना केंद्रित करण्यात आली आहे.