नुकताच व्हाइस ॲडमिरल ए.एन. प्रमोद यांच्याकडे उप-नौदल प्रमुख (Deputy Chief of Naval Staff - DCNS) म्हणून पदभार सुपूर्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे:

  • व्हाइस ॲडमिरल ए.एन. प्रमोद यांनी भारतीय नौदलाच्या (Indian Navy - IN) उप-नौदल प्रमुख (Deputy Chief of Naval Staff - DCNS) या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.
  • त्यांनी ३८ वर्षांहून अधिक काळ सेवा बजावणाऱ्या व्हाइस ॲडमिरल तरुण सोबती यांची जागा घेतली.

ए.एन. प्रमोद यांच्याबद्दल थोडक्यात:

  • ते गोवा येथील नौदल अकादमीमध्ये ३८ व्या एकात्मिक कॅडेट अभ्यासक्रमानंतर (Integrated Cadet Course) १ जुलै १९९० रोजी भारतीय नौदलात रुजू झाले होते.
  • प्रमोद हे संवाद (Communication) आणि इलेक्ट्रॉनिक युद्धतंत्र (Electronic Warfare) या क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत.
  • डिसेंबर २०२३ ते जुलै २०२६ या कालावधीत त्यांनी 'नौदल कामकाज महासंचालक (Director General Naval Operations - DGNO)' म्हणून काम पाहण्यासोबतच 'ऑपरेशन सिंदूर' तसेच सागरी सुरक्षा मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
  • गलवान घटनेनंतर 'ऑपरेशन स्नो लेपर्ड' दरम्यान त्यांनी पश्चिम नौदल ताफ्याचे 'फ्लीट ऑपरेशन्स ऑफिसर' म्हणून काम केले.
  • त्यांनी 'ऑपरेशन विजय' (१९९९) आणि 'ऑपरेशन पराक्रम' (२००१) मध्ये सहभाग घेतला होता.
  • त्यांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल २०२४ मध्ये 'अति विशिष्ट सेवा पदक (Ati Vishisht Seva Medal - AVSM)' आणि २०२५ मध्ये 'युद्ध सेवा पदक' (Yudh Seva Medal - YSM) देऊन सन्मानित करण्यात आले.