नुकतेच ज्येष्ठ तमिळ अभ्यासक, वक्ते आणि पद्मश्री पुरस्कार विजेते सोलोमन पप्पैया यांचे दुःखद निधन झाले आहे.
ठळक मुद्दे:
- पप्पैया यांचे मदुराई, तमिळनाडू येथे वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले आहे.
- तमिळनाडूतील मदुराई जिल्ह्यातील तिरुमंगलम येथे २२ फेब्रुवारी १९३६ रोजी त्यांचा जन्म झाला होता.
- २०२१ मध्ये तमिळ साहित्यातील त्यांच्या विशेष योगदानाची दखल घेत त्यांना भारताचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान 'पद्मश्री' पुरस्काराने (साहित्य आणि शिक्षण क्षेत्र) सन्मानित करण्यात आले होते.
सोलोमन पप्पैया यांच्या बाबत महत्वपूर्ण माहिती:
- मदुराई, तमिळनाडू येथील अमेरिकन कॉलेजमध्ये तमिळ विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी १९६१ ते १९९४ या काळात काम पाहिले होते.
- दूरदर्शनवरील 'पट्टिमंड्रम' अर्थात 'तमिळ वादविवाद कार्यक्रमासाठी' ते अत्यंत लोकप्रिय होते.
- आपल्या संबंध आयुष्यात त्यांनी जवळपास १२,००० हून अधिक पट्टिमंड्रमचे सूत्रसंचालन केले.
चित्रपट भूमिका (चित्रपटाचे नाव - प्रदर्शित वर्ष):
- शिवाजी: द बॉस (२००७)
- बॉईज (२००३)
- मुधलवन (१९९९)
प्राप्त पुरस्कार/सन्मान (पुरस्कार नाव - प्राप्त वर्ष):
- पद्मश्री (२०२१)
- कलैममनी पुरस्कार (२०००) - तमिळनाडू सरकार, तमिळ भाषा आणि साहित्यातील त्यांच्या असाधारण योगदानासाठी