नुकतेच 'थेनिसाई थेन्ड्रल (Thenisai Thendral)' म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ तमिळ संगीतकार देवा यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे.

ठळक मुद्दे:

  • तमिळ चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक आणि संगीतकार देवानेसन चोक्कलिंगम हे 'देवा' या नावाने लोकप्रिय होते.
  • तमिळनाडूतील चेन्नई येथे त्यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले आहे.
  • २० नोव्हेंबर १९५० रोजी चेन्नईतील मायलापोर येथे त्यांचा जन्म झाला होता.

देवानेसन चोक्कलिंगम यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती:

  • देवा हे १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि १९९० च्या दशकात तमिळ चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध झाले होते.
  • लोकसंगीतावर आधारित 'गाना' संगीत त्यांनी लोकप्रिय केले होते.

उल्लेखनीय कारकीर्द:

  • जवळपास ४ दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी तमिळ, तेलुगू, कन्नड तसेच मल्याळम अशा विविध भाषांमधील ४०० हून अधिक चित्रपटांसाठी गाणी आणि पार्श्वसंगीत दिले होते.
  • चित्रपटसृष्टीत त्यांनी 'मट्टुक्कारा मन्नारू' (१९८६) या चित्रपटाद्वारे पदार्पण केले होते.

प्राप्त पुरस्कार:

  • 'कलैममनी' पुरस्कार
  • 'वैकासी पोरांताचू' (१९९०) आणि 'आसाई' (१९९५) या चित्रपटांसाठी - सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक (तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार)
  • 'अमृता वर्षिणी' (१९९७) या कन्नड चित्रपटासाठी - फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक पुरस्कार