मल्याळम नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेत्री सावित्री श्रीधरन यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.
ठळक मुद्दे:
- केरळमधील कोझिकोड येथे सावित्री श्रीधरन यांचे निधन झाले आहे.
सावित्री श्रीधरन यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती:
- केरळमध्ये जन्मलेल्या सावित्री श्रीधरन या मल्याळम नाट्यसृष्टीतील एक दिग्गज आणि सुप्रसिद्ध व्यक्तिमत्त्व होत्या.
- रंगमंचावर ४ दशकांहून अधिक काळ दमदार अभिनय केल्यानंतर त्यांनी मल्याळम चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.
- १९६१ मध्ये रंगभूमीवरून अभिनयाला सुरुवात करत १९८४ मध्ये त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल ठेवले होते.
- 'कडावू' या एम. टी. वासुदेवन नायर दिग्दर्शित चित्रपटाद्वारे त्यांनी मल्याळम चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.
उल्लेखनीय भूमिका:
- त्यांना 'सुदानी फ्रॉम नायजेरिया' या चित्रपटातील 'जमीला' या भूमिकेसाठी त्यांना ६६ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये (२०१८ साठी) 'विशेष ज्युरी उल्लेख' आणि 'सर्वोत्कृष्ट चरित्र अभिनेत्री' म्हणून केरळ राज्य चित्रपट पुरस्कार मिळाला होता.
पुरस्कार आणि सन्मान:
- केरळ राज्य सरकारचा 'सर्वोत्कृष्ट नाट्य अभिनेत्री' पुरस्कार (१९७७ आणि १९९३)
- नाटक योगदानासाठी 'केरळ संगीत नाटक अकादमी पुरस्कार' (२००९)