नुकतेच हॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते टॉम स्केरिट यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे.

ठळक मुद्दे:

  • अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्यातील सिएटल येथे वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे.
  • २५ ऑगस्ट १९३३ रोजी अमेरिकेतील मिशिगन राज्यातील डेट्रॉईट येथे त्यांचा जन्म झाला होता.
  • अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी त्यांनी युनायटेड स्टेट्स हवाई दलात सेवा बजावली होती.

टॉम स्केरिट यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती:

चित्रपट कारकीर्द:

  • 'वॉर हंट' (War Hunt) या चित्रपटातून पदार्पण (१९६२) - यात त्यांच्यासोबत रॉबर्ट रेडफोर्ड होते.

प्रमुख भूमिका:

  • 'मॅश' (१९७०) मध्ये 'ड्यूक फॉरेस्ट'
  • 'एलियन' (१९७९) मध्ये 'कॅप्टन डॅलस'
  • 'टॉप गन' (१९८६) मध्ये 'कमांडर माईक "वायपर" मेटकाफ'

कारकीर्द आणि पुरस्कार:

  • 'पिकेट फेन्सेस' (१९९२–१९९६) या मालिकेत 'शेरिफ जिमी ब्रॉक'ची भूमिका साकारल्याबद्दल - 'प्राइमटाइम एमी अवॉर्ड' (उत्कृष्ट मुख्य अभिनेता - ड्रामा मालिका) (१९९३)