नुकतेच ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक सिंगीथम श्रीनिवास राव यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे.

ठळक मुद्दे:

  • चेन्नई, तमिळनाडू येथील एका रुग्णालयात ज्येष्ठ भारतीय चित्रपट निर्माते-दिग्दर्शक सिंगीथम श्रीनिवास राव यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले आहे.
  • २१ सप्टेंबर १९३१ रोजी गुदूर, आंध्र प्रदेश येथे त्यांचा जन्म झाला होता.

सिंगीथम श्रीनिवास राव यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती:

  • ते एक चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, संगीतकार तसेक अभिनेते म्हणून सुप्रसिद्ध होते.
  • ६ दशकांहून अधिक काळ त्यांची कारकीर्द चालली. 
  • तेलगू, तमिळ, कन्नड, मल्याळम, हिंदी आणि इंग्रजी अशा विविध भाषांमधील सुमारे ६० चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले होते.

उल्लेखनीय चित्रपट:

  • मयूरी (१९८५)
  • पुष्पक विमानम (१९८७)
  • आदित्य ३६९ (१९९१)
  • भैरव द्वीपम (१९९४)

प्राप्त पुरस्कार:

  • २ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (१९७३, १९८८)
  • ५ नंदी पुरस्कार (१९८५, १९९२, १९९४, २०१२)
  • ३ कर्नाटक राज्य चित्रपट पुरस्कार (१९८२, १९८५, १९८६)
  • ३ फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण (१९७४, १९८५, १९८७)
  • जीवनगौरव पुरस्कार, फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया (२०११)