नुकतेच ज्येष्ठ डोगरी लेखक, पटकथा लेखक आणि चित्रपट निर्माते वेद राही यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे.

ठळक मुद्दे:

  • महाराष्ट्रातील ठाणे येथे त्यांचे ९३ व्या वर्षी निधन झाले आहे.
  • २२ मे १९३३ रोजी जम्मू (जम्मू आणि काश्मीर) येथे त्यांचा जन्म झाला होता.

वेद राही यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती:

  • ते १९२४ मध्ये जम्मू आणि काश्मीर या संस्थानात पहिले वृत्तपत्र सुरू करणाऱ्या लाला मुल्क राज सराफ यांचे सुपुत्र होते.
  • त्यांनी कथा, कादंबऱ्या तसेच कवितांच्या माध्यमातून डोगरी साहित्यात मोलाचे योगदान दिले आहे.
  • त्यांनी 'ये रात फिर ना आएगी' आणि 'बेजुबान'सह सुमारे २५ हिंदी चित्रपटांसाठी पटकथा आणि संवाद लिहिले होते.

दिग्दर्शित चित्रपट:

  • प्रेम पर्वत
  • काली घटा
  • वीर सावरकर

दिग्दर्शित मालिका:

  • गुल गुलशन गुलफाम
  • मीरा
  • रिश्ते

प्राप्त सन्मान/ पुरस्कार:

  • साहित्य अकादमी पुरस्कार (१९८३)
  • साहित्य अकादमी फेलोशिप (महत्तर सदस्यता) प्रदान - २०२४
  • महाराष्ट्र गौरव पुरस्कार
  • राहुल सांकृत्यायन पुरस्कार
  • कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार