नुकताच ज्येष्ठ अभिनेते पद्मभूषण अनंत नाग यांना 'दादासाहेब फाळके पुरस्कार २०२४' जाहीर करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे:

  • भारत सरकारमार्फत ज्येष्ठ अभिनेते पद्मभूषण अनंत नाग यांना 'दादासाहेब फाळके पुरस्कार २०२४' देऊन सन्मानित करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
  • भारतीय चित्रपटसृष्टीच्या प्रगती तसेच विकासामधील उत्कृष्ट योगदानाबद्दल 'दादासाहेब फाळके पुरस्कार निवड समिती'च्या शिफारशीनुसार त्यांची निवड करण्यात आली आहे.
  • २२ सप्टेंबर २०२६ रोजी गुजरातमधील केवडिया (एकता नगर) येथे होणाऱ्या ७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सदर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
  • अनंत नाग हे 'दादासाहेब फाळके पुरस्कार' मिळवणारे ५६ वे मानकरी ठरले आहेत.
  • १९९५ साली सुप्रसिद्ध अभिनेते राजकुमार यांनी हा पुरस्कार जिंकल्यानंतर हा सन्मान मिळवणारे कन्नड चित्रपटसृष्टीतील ते दुसरे कलाकार ठरले आहेत.

अनंत नाग यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती:

  • 'अनंत नगरकट्टे' कन्नड चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक मानले जातात. ते 'अनंत नाग' म्हणूनच सुपरिचित आहेत.
  • ५ दशकांहून अधिक काळाच्या आपल्या भारतीय चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीत त्यांनी मुख्य प्रवाहातील तसेच समांतर अशा दोन्ही प्रकारच्या चित्रपटांमध्ये अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे.
  • २०२३ मध्ये त्यांनी आपल्या ५० वर्षांच्या चित्रपट प्रवासाचा 'सुवर्णमहोत्सव' साजरा केला होता.

प्राप्त पुरस्कार आणि सन्मान:

  • दादासाहेब फाळके पुरस्कार २०२४ (२०२६ मध्ये जाहीर)
  • पद्मभूषण (२०२५)
  • ५ फिल्मफेअर पुरस्कार
  • ५ कर्नाटक राज्य सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार
  • कर्नाटक साहित्य अकादमी पुरस्कार
  • कर्नाटक राज्य जीवनगौरव पुरस्कार
  • बंगळुरू विद्यापीठ (उत्तर), कर्नाटक यांच्याकडून मानद डॉक्टरेट
  • कर्नाटक राज्योत्सव पुरस्कार

दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्तकर्ते (प्राप्तकर्ता - वर्ष):

  • मिथुन चक्रवर्ती (२०२२)
  • मोहनलाल (२०२३)
  • अनंत नाग (२०२४)