नुकताच भरतनाट्यम आणि भारतीय शास्त्रीय नृत्यातील योगदानाबद्दल वसुंधरा डोरास्वामी यांना 'पद्मभूषण गुरू डॉ. सरोजा वैद्यनाथन एक्सलन्स अवॉर्ड (Padmabhushan Guru Dr Saroja Vaidyanathan Excellence Award ) २०२६' जाहीर करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे:

  • डॉ. वसुंधरा डोरास्वामी या भरतनाट्यमच्या प्रख्यात नृत्यांगना, नृत्यदिग्दर्शिका तसेच संशोधक म्हणून सुप्रसिद्ध आहेत.
  • २६-२७ सप्टेंबर रोजी विशाखापट्टणम येथे होणाऱ्या 'वैशाखी नृत्योत्सव' या भारतीय नृत्य महोत्सवादरम्यान 'नटराज म्युझिक अँड डान्स अकादमी' मार्फत सदर पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
  • डॉ. वसुंधरा डोरास्वामी या म्हैसूर येथील एक सुप्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना, नृत्यदिग्दर्शिका आणि अभ्यासक आहेत.
  • त्यांची कारकीर्द साधारणतः ५ दशकांहून अधिक काळाची आहे.
  • त्या भरतनाट्यम आणि अष्टांग विन्यास योगा यांच्यातील संबंधांवर आधारित कार्यासाठी विशेष लोकप्रिय आहेत.

डोरास्वामी यांचे नृत्यदिग्दर्शन आणि प्राप्त पुरस्कार:

नृत्य दिग्दर्शन:

  • 'पांचाली', 'गंगा लहरी' आणि 'सामवेद' यांसारख्या अनेक प्रशंसित एकल नृत्य सादरीकरणांचे नृत्यदिग्दर्शन

प्राप्त पुरस्कार:

  • संगीत नाटक अकादमी पुरस्कार
  • शांतला पुरस्कार
  • लुईसविले, केंटकी (Louisville, Kentucky) येथील मानद नागरिकत्व