नुकतीच वर्षा अशोक आगलावे यांची भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणच्या (Geological Survey of India - GSI) पहिल्या महिला महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे:
- वर्षा अशोक आगलावे यांनी भारत सरकारच्या खाण मंत्रालयांतर्गत असलेल्या भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणच्या (Geological Survey of India - GSI) ५४ व्या महासंचालक (Director General - DG) म्हणून पदभार स्वीकारला आहे.
- सदर संस्थेच्या १७६ वर्षांच्या इतिहासात प्रमुखपद भूषविणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.
- त्यांनी असित साहा यांची जागा घेतली.
- वर्षा आगलावे आता महत्त्वपूर्ण खनिजांचा शोध, खनिज सुरक्षा, समुद्रतटीय शोधकार्य तसेच भू-वैज्ञानिक पायाभूत सुविधांचे बळकटीकरण यांवर लक्ष केंद्रित करतील.
- त्या तीन दशकांहून अधिक व्यावसायिक अनुभव असलेल्या एक प्रतिष्ठित भू-वैज्ञानिक आहेत. 'इंडियन ब्युरो ऑफ माइन्स' (IBM) मध्ये काम केल्यानंतर १९९२ मध्ये त्या GSI मध्ये रुजू झाल्या होत्या.
- त्या जीवाश्मशास्त्र (Palaeontology) आणि परागरज-बीजाणू अभ्यास (Palynology) या क्षेत्रांतील तज्ज्ञ आहेत.