नुकतेच उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्यामार्फत भाजप राष्ट्रीय सचिव अनिल के. अँटोनी लिखित ‘ॲडव्हांटेज इंडिया: रीशेपिंग द फ्युचर फॉर ॲन इक्विटेबल वर्ल्ड (Advantage India: Reshaping the Future for an Equitable World)' नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे:

  • उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी नवी दिल्ली येथील उपराष्ट्रपती भवनात या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे.
  • सदर पुस्तकात भारताचे परिवर्तन, तांत्रिक प्रगती तसेच जागतिक स्तरावरील भारताची भूमिका यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
  • भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव अनिल के. अँटोनी यांनी लिहिलेले हे पुस्तक ‘रूपा पब्लिकेशन्सद्वारे (Rupa Publications)' प्रकाशित करण्यात आले आहे.