नुकतेच उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते आंध्र प्रदेशात भारतातील पहिल्या स्वदेशी जनुकीय बदल न केलेल्या (non-Genetically Modified Organism - non-GMO) पॉपकॉर्न मक्याच्या संकरित वाणाचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे:

  • उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते आंध्र प्रदेशातील एलुरू जिल्ह्यातील मुसुनुरू येथील 'गॉरमेट पॉपकॉर्निका (Gourmet Popcornica)' केंद्रावर भारतातील पहिल्या स्वदेशी जनुकीय बदल न केलेल्या (non-Genetically Modified Organism - non-GMO) आणि उच्च-विस्तार क्षमता असलेल्या पॉपकॉर्न मक्याच्या (Zea mays) संकरित वाणाचे अनावरण करण्यात आले आहे.
  • सदर कार्यक्रमास आंध्र प्रदेशचे राज्यपाल एस. अब्दुल नझीर आणि मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू उपस्थित होते.

स्वदेशी पॉपकॉर्न मक्याच्या संकरित बियाण्याबद्दल माहिती:

  • सदर संकरित बियाणे भारतीय कृषी संशोधन परिषद – भारतीय मका संशोधन संस्था' (Indian Council of Agricultural Research–Indian Institute of Maize Research - ICAR–IIMR) आणि 'गॉरमेट पॉपकॉर्निका (Gourmet Popcornica)' यांच्यातील वैज्ञानिक आणि व्यावसायिक सहकार्यातून विकसित करण्यात आले आहे.
  • फेब्रुवारी २०२१ मध्ये या प्रक्रियेची सुरुवात झाली होती.
  • हे संकरित बियाणे पारंपरिक नॉन-जीएमओ संकरित प्रजनन पद्धतींचा वापर करून विकसित करण्यात आले आहे.
  • हे स्वदेशी संकरित बियाणे पॉपकॉर्न मक्याशी संबंधित तंत्रज्ञानासाठी भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी करेल अशी अपेक्षा आहे.

ICAR-IIMR बद्दल महत्वपूर्ण माहिती:

  • स्थापना वर्ष: १९५७ मध्ये या संस्थेची स्थापना झाली होती.
  • मुख्यालय ठिकाण: पंजाबमधील लुधियाना येथे ICAR–IIMR के मुख्यालय स्थित आहे. 
  • मुख्य उद्देश: मक्याचे प्रजनन, पीक सुधारणा, कृषी-शास्त्र (agronomy), मूल्य-साखळी विकास आणि तंत्रज्ञान हस्तांतरण या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे.