नवी दिल्ली येथे नुकतेच उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते ‘मल्हार (MALHAR) २०२६’ चे उद्घाटन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे:

  • भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी नवी दिल्ली येथे ‘मल्हार २०२६’ कार्यक्रमाचे उद्घाटन केले आहे.
  • हा कार्यक्रम ‘अंतर हृदय कनेक्टद्वारे (Antar Hriday Connect)' आयोजित करण्यात आलेला होता.
  • भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित तसेच पावसाळ्याच्या संकल्पनेवर केंद्रित असलेला तरुणांसाठीचा एक मोठा उत्सव होता.

‘मल्हार २०२६’ बद्दल थोडक्यात महत्वाचे:

  • भारताच्या शास्त्रीय संगीत परंपरांचे दर्शन घडवण्यासाठी आणि विविध कला वारशाचा उत्सव साजरा करण्यासाठी आयोजित केला जाणारा हा एक सांस्कृतिक कार्यक्रम आहे.
  • या कार्यक्रमाच्या माध्यमातून शास्त्रीय संगीतकार, पारंपरिक कलाकार तसेच संगीतप्रेमींना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येते.
  • ‘मल्हार २०२६’ मध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा, शास्त्रीय व समकालीन संगीत, नृत्य, नाट्य आणि साहित्यिक कार्यक्रमांचा आणि सादरीकरणांचा समावेश होता.
  • शैक्षणिक संस्था, सांस्कृतिक गट आणि भारतातील विविध भागांतील उदयोमुख कलाकारांचा या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला.
  • 'मल्हार राग' ही वर्षा ऋतुशी संबंधित शास्त्रीय संगीताची एक परंपरा असून ती १६ व्या शतकातील प्रसिद्ध संगीतकार तानसेन यांच्याशी जोडली गेली आहे.